Monday, November 30, 2020

संघटनात्मक कामाच्या जोरावरच संघटनेची अल्पावधीत गरूड झेप.. गोविंद पाटील

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना..

       🚩 तालुका शाखा भुदरगड 🚩

          ✡️ सहविचार सभा.✡️



       कोणताही गट - तट न मानता, शिक्षक ही एकच जात व सेवा हा एकच धर्म समजून संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील व राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविण्यात आले असून संघटनात्मक कामाच्या जोरावरच महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने अल्पावधीतच जिल्ह्यात व राज्यात गरूड झेप घेतली असल्याचे प्रतिपादन संघटनेचे कोल्हापूर जिल्हा नेते गोविंद पाटील यांनी केले. संघटनेच्या तालुका शाखा भुदरगड च्या सहविचार सभेत अध्यक्ष पदावरून ते बोलत होते.

     ते पुढे म्हणाले 2005 पासून प्रसाद पाटील यांचे उगवते नेतृत्व काहींच्या डोळ्यात खूपत होते, विरोधकांनी अनेक गैरमार्गांचा वापर करून प्रसाद पाटील यांचा लढा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. पण प्रसाद पाटील व पुरोगामी शिक्षक परिवाराने मोठा संघर्ष करून आपल्या कामातून सर्वांना योग्य उत्तर दिले आहे.

     प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रसाद पाटील म्हणाले कै गोरखनाथ पांढरबळे यांच्या साथीने 1996 साली या संघटनेत काम करीत असल्यापासून अनेक अडथळे आले. पण त्यावेळी भुदरगड तालुका खंबीरपणे पाठिशी उभा राहिला कालांतराने सर्व जिल्हा पाठिशी उभा राहिला म्हणून आपण अनेक लढे यशस्वी करू शकलो.

     यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष एस के पाटील म्हणाले कोणताही भेद न मानता सर्वांना समान न्याय देणारी संघटना म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाच्या मनात या संघटनेचे मानाचे स्थान आहे याचा अभिमान वाटतो.

     जिल्हा सरचिटणीस शंकर पवार म्हणाले प्रसाद पाटील यांचे नेतृत्वाखाली बँक बचाव कृती समितीने 2005 पासून दिलेला संघर्षमय लढा सर्वांना ज्ञात असून प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी संचालकांनी ठामपणे विरोधी भुमिका वठवल्याने कोल्हापूर शिक्षक बँकेची आजची आर्थिक स्थिती मजबूत झाली असून सभासदांना समाधानकारक व्याज व लाभांश मिळत आहे आणि बँकेच्या इतिहासात पहिल्यांदा कर्जावरील व्याजदरही 11% पर्यंत खाली आला. कोणत्याही आमिषाला बळी न पडता सभासदांनी दाखवलेल्या विश्वासास पात्र राहूनच प्रसाद पाटील यांनी काम केल्याने बँकेचा खरा नफा दिसत आहे.

     कार्याध्यक्ष सुनिल पोवार सर यांनी रोस्टर पुर्ततेसाठी प्रसाद पाटील यांचे योगदान, कोषाध्यक्ष खाडे सर यांनी संघटनेचे सामाजिक कार्य व उपक्रम, जिल्हा प्रमुख संघटक दिगंबर टिपुगडे यांनी कोणत्याही प्रश्नाबाबत संघटनेची अभ्यासपूर्ण मांडणी, जिल्हा सरचिटणीस शारदा वाडकर यांनी संघटनेत महिलांना असलेला सन्मान, महिला राज्य उपाध्यक्षा प्रमिला माने व राज्य उपाध्यक्ष दिलीप भोई यांनी संघटनेचे राज्य पातळीवरील काम याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

     सभेस राज्य कार्यकारी सचिव रंगराव वाडकर, जिल्हा विभागीय उपाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा संघटक नामदेव पाटील, आनंदराव जाधव, नितीन कांबळे यांचेसह..

भुदरगड तालुका कार्यकारणी

अध्यक्ष- नारायण कोटकर

सरचिटणीस- जयदीप डाकरे

कार्याध्यक्ष- दत्तात्रय रेपे

कोषाध्यक्ष- संतोष डवरी

प्रमुख संघटक- दिग्विजय कोटकर

महिला अध्यक्षा - वैशाली केळसकर

म.सरचिटणीस- रूपाली ढेरे

उपाध्यक्ष- अंकुश पाटील

 प्रसिद्धी प्रमुख- प्रविण डाकरे

  प्रमुख सल्लागार- नेताजी पाटील

संघटक- संदिप सरवंदे

              वैभव डाकरे

             सुशांत कांबळे

            चंद्रशेखर मोरे


भुदरगड शाखा पदसिद्ध सदस्य

राज्य संघटक- पी आर पाटील

जिल्हा नेते- गोविंद पाटील

===================

       आदी पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

    स्वागत व प्रास्ताविक तालुका अध्यक्ष नारायण कोटकर यांनी केले, आभार तालुका प्रमुख संघटक दिग्विजय कोटकर यांनी मानले. सुत्र संचलन राज्य संघटक पी आर पाटील यांनी केले.

🙏

कोरोना काळातही कागल तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची कार्य कौतुकास्पद- शिक्षण सभापती अंबरिषसिंग घाटगे

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनगेकर यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या पहिल्या शिष्यवृत्ती सराव चाच...