Wednesday, February 10, 2021

कोरोना काळातही कागल तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची कार्य कौतुकास्पद- शिक्षण सभापती अंबरिषसिंग घाटगे

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनगेकर यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या पहिल्या शिष्यवृत्ती सराव चाचणी च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते . शिष्यवृत्ती सराव चाचणी उद्घाटन सोहळा विद्या मंदिर बाचणी ता कागल शाळेत संपन्न झाला .. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती पूनम मगदूम होत्या . कागल तालुका शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवण्यासाठी शिक्षक जादा वेळ देऊन मार्गदर्शन करत असतात . कागल तालुक्यातील मार्गदर्शक शिक्षकांचे कार्य खूप मोलाचे आहे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी डॉक्टर जी बी कमळकर यांनी केले .. कार्यक्रमाला उपसभापती अंजना सुतार, राजाराम वरुटे , जी एस पाटील , सुकुमार पाटील , भिकाजी सोनाळकर , अल्लाबक्ष शहाणेदिवाण, उत्तम पाटील , आवेलीन देसा , सदानंद पाटील , प्रकाश मगदूम , कास्ट्राईब महासंघाचे पदाधिकारी , शिक्षक उपस्थित होते . प्रास्ताविक एस के पाटील, स्वागत अंकूश माने यांनी तर आभार संजय चिखलीकर यांनी मानले .

कोरोना काळातही कागल तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची कार्य कौतुकास्पद- शिक्षण सभापती अंबरिषसिंग घाटगे

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनगेकर यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या पहिल्या शिष्यवृत्ती सराव चाच...