Saturday, January 30, 2021

ग्लोबल टीचर रणजित डिसले सर यांचे उपस्थितीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांचे हस्ते यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे सत्कार संपन्न..

सन 2019-20 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती,प्रज्ञाशोध,, जे पी नाईक समृध्द शाळा अभियान पुरस्कार प्राप्त शाळा ...यशस्वी विद्यार्थी,,,, मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचा सत्कार पं समिती कागल यांचे मार्फत आज ग्लोबल टिचर रणजीत डिसले सर यांचे उपस्थितीत, ग्रामविकास मंत्री हसनसो मुश्रीफ साहेब यांचे हस्ते संपन्न झाला.

      तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ जी बी कमळकर साहेब यांचे नेतृत्वाखाली संयोजन समिती सदस्यांनी कार्यक्रमाचे देखणे ,नेटके व सुक्ष्म  नियोजन केले होते .. विशेषतः मटकरी हॉलचे मालक यांनी सर्व सोयींनी सुसज्ज असा मोफत हॉल उपलब्ध करून दिला .. सोबत मोफत नाष्टाही .. त्यांचे आभार मानावे तितके थोडकेच .. 

      ग्लोबल टिचर रणजीत सरांनी दोन तास खुर्चीला खिळवून ठेवणारे केलेले लोकल ते ग्लोबल प्रवासाचे प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमांची उंची वाढविणारे होते ..

      ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेबांचे कार्य सर्वांना सर्वश्रृत आहेच .. आज तब्बल तीन चार वेळ देऊन व्यक्तिशः सर्वांचा सत्कार करून प्रोत्साहित केले .. त्यामूळे पुरस्कार प्राप्त शिक्षक , विद्यार्थी कृतार्थ झाले . . साहेबांना अंतकरण पूर्वक धन्यवाद .

           कोल्हापूरचे ग्लोबल पदाधिकारी, १०० % डिजीटल वर्गाचे निर्माते   मा शिक्षण सभापती अमरीषदादांचेही मार्गदर्शन खूप अनमोल वाटले ..

         कार्यक्रमासाठी शेवटपर्यंत उपस्थित राहिलेले शिक्षण सभापती प्रवीण यादव साहेब ,मुख्य कार्यकारी अधिकारी  चव्हाण साहेब , शिक्षणाधिकारी उबाळे मॅडम, गटविकास अधिकारी संसारे  साहेब , कार्यक्रमाच्या अध्यक्षा पूनम मगदूम मॅडम , जि प सदस्य , पं स सदस्य यांच्याही उपस्थितीमूळे कार्यक्रमाची उंची वाढली .

       गेले महिनाभर याचे नियोजन सुरु होते .. विद्यार्थी , मार्गदर्शक यांच्या याद्या करणे , फोटो संकलीत करणे.. सन्मानपत्र , स्मृतीचिन्ह तयार करणे .. या सर्व नियोजनासाठी अगदी रात्र रात्रभर काम सुरू होते .. बाबासाहेब कमळकर सर , संजय मांडवे सर , रमेश कदम सर , गावडे साहेब यांनी तर खूप कष्ट घेतले ..

 विस्तार अधिकारी कासोटे मॅडम , आर व्ही कांबळे साहेब , संकेश्वरे साहेब , केंद्रप्रमुख किणेकर मॅडम यांचे वेळावेळी मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम प्रसंगी त्यांची नियोजन धावपळ ... शेवटच्या महत्वाच्या क्षणी गुंडाळे सर , आर एस पाटील सर , सुनिल चौगले सर , विजय मिस्त्री सर , बाबूराव चव्हाण सर , सुनिल पाटील सर , संजय कुदळे सर , विठ्ठल पाटील सर, सर्व BRC समन्वयक या मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले . .. आपल्या अमोघ वाणीने मंत्रमुग्ध करणारे सुत्रसंचालक विवेक गवळी सर , वनिता साबणे मॅडम , गीतांजली पाटील मॅडम यांच्या सुत्रसंचालनाने कार्यक्रम सुसुत्रपणे पार पडण्यास मदत झाली ..

        सर्वांच्या सहकार्याने खूप सुंदर कार्यक्रम झाला .. कार्यक्रम करताना किती धावपळ होते हे कार्यक्रम नियोजन कर्त्यांनाच माहित असते .. आणि कार्यक्रम यशस्वी झाले नंतर त्यानंतर मिळणारा आनंद म्हणजे स्वर्गसुख असते .. हे आम्हां सातत्याने अनुभवतो म्हणून आजच्या कार्यक्रमाचे सिंहावलोकन .. . कार्यकमात कांही त्रुटी राहिल्या असतीलही पण चांगले , मोठे कार्यक्रम केले तर कांही त्रुटी राहतात ,केलेच नाही कार्यक्रम तर असे प्रश्नच उद्भवत नाहीत .. त्यामूळे त्याकडे दुर्लक्ष करून प्रोत्साहीत करणे महत्वाचे वाटते  . . 

      कार्यक्रमाचे सर्वात मोठे श्रेय कोणाचे असेल तर ते एक हजारांपासून एकवीस हजारांपर्यत मदत करणाऱ्या दातृत्वान शिक्षक, अधिकारी आणि सामाजिक बंधू भगिनींचे.. ज्यांच्या दातृत्वातून बारा लाखाचा गंगाजळीचा टप्पा पार झाला आणि आजच्या कार्यक्रमाला भव्य दिव्य स्वरूप आले

       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांना मनापासून धन्यवाद

🙏🙏🙏🙏🙏

  

एस के पाटील , जिल्हाध्यक्ष पुरोगामी तथा शिष्यवृत्ती एक्सपर्ट टीम सदस्य

No comments:

Post a Comment

कोरोना काळातही कागल तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची कार्य कौतुकास्पद- शिक्षण सभापती अंबरिषसिंग घाटगे

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनगेकर यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या पहिल्या शिष्यवृत्ती सराव चाच...