Sunday, December 6, 2020

कै. रवि शेंडे यांची स्वप्नपूर्ती हीच त्यांना खरी श्रध्दांजली.. प्रसाद पाटील

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना..
       🚩 तालुका शाखा आजरा 🚩
          ✡️ अधिवेशन ✡️



       शिक्षक नेते कै. रवि शेंडे यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली असल्याने शेंडे सरांच्या स्वप्न पूर्ततेसाठी आपण सर्वांनी कंबर कसली पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले.
     नुकत्याच आजरा येथे झालेल्या आजरा तालुका शाखा अधिवेशन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.के एस पाटील होते.
       
प्रसाद पाटील पुढे म्हणाले 2015 च्या शिक्षक बँक निवडणुकीत प्रसाद पाटील व रवि श़ेडे जोडी फोडण्यात विरोधक यशस्वी झाले होते. आमच्या जोडीचा धसका घेऊन ही जोडी फोडण्यासाठी सर्व विरोधक एकवटले होते. युती करताना आजरा तालुका आमच्या वाट्याला न सोडल्याने रवि शेंडे यांना उमेदवारी आम्हाला देता आली नाही. याचा फायदा विरोधांनी उठवून आमच्यामध्ये दरी निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले होते.
       आमच्यात तात्विक मतभेद असले तरी मनभेद कधीच नव्हते त्यामुळे आज सर्व मतभेद विसरून पुन्हा एकत्र येऊन काम करण्याचा आजरा शाखेने घेतलेला निर्णयाचे आम्ही स्वागत करीत असून रवि शेंडे सरांच्या स्वप्न पूर्ततेसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार आहोत.
       यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष एस के पाटील म्हणाले कोणताही गट - तट न मानता, शिक्षक ही एकच जात व सेवा हा एकच धर्म समजून संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील व राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविण्यात आले आहेत.
       जिल्हा सरचिटणीस शंकर पवार म्हणाले, संघटनात्मक कामाच्या जोरावरच महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने अल्पावधीतच जिल्ह्यात व राज्यात गरूड झेप घेतली असून पाच वर्षाचा आपला दुरावा संपला असून आजचा हा कार्यक्रम विरोधकांना भूवया उंचवायला लावणारा आहे.
       राज्य उपाध्यक्ष दिलीप भोई म्हणाले प्रसाद पाटील सर यांच्या खांद्याला खांदा लावून रवि शेंडे यांनी सन 2005 बँक बचाव कृती समितीचा यशस्वी लढा उभा केला होता. त्या लढ्यामुळेच बँक आज सुस्थितीत आली आहे.
     जिल्हा प्रसिध्दी प्रमुख दिगंबर टिपुगडे म्हणाले प्रसाद पाटील यांचे नेतृत्वाखाली बँक बचाव कृती समितीने 2005 पासून दिलेला संघर्षमय लढा सर्वांना ज्ञात असून प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी संचालकांनी ठामपणे विरोधी भुमिका वठवल्याने कोल्हापूर शिक्षक बँकेची आजची आर्थिक स्थिती मजबूत झाली असून सभासदांना समाधानकारक व्याज व लाभांश मिळत आहे आणि कर्जावरील व्याजदरही 11% पर्यंत खाली आणता आला. कोणत्याही आमिषाला बळी न पडता सभासदांनी दाखवलेल्या विश्वासास पात्र राहूनच प्रसाद पाटील यांनी काम केल्याने बँकेचा खरा नफा दिसत आहे.
      शिक्षक नेते तानाजी पावले यांनी पुरोगामी शिक्षक संघटनेचा जन्मच संघर्षासाठी झाला असून कै रवि शेंडे यांच्या स्वप्न पूर्ततेसाठी आज-यातील सर्व ताकद पुरोगामी शिक्षक संघटनेच्या पाठिशी उभा केली जाईल असे सांगितले.
     कार्याध्यक्ष सुनिल पोवार सर यांनी रोस्टर पुर्ततेसाठी प्रसाद पाटील यांचे योगदान, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख अशोक खाडे सर यांनी संघटनेचे सामाजिक कार्य व उपक्रम, राज्य संचटक पी आर पाटील यांनी अल्पावधीत पुरोगामी परिवाराने कोविड सेंटरनां केलेली मदत, महिला जिल्हा सरचिटणीस शारदा वाडकर यांनी संघटनेत महिलांना असलेला सन्मान याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
     सभेस राज्य कार्यकारी सचिव रंगराव वाडकर, जिल्हा संघटक नामदेव पाटील, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष सुरेश हुली , विकास पाटील , सुरेश गुरव , सुरेश पूजारी , सुरेश गुडूळकर , भुदरगड सरचिटणीस जयदीप डाकरे , दिग्विजय कोटकर , दिलीप कांबळे, संदीप गिरी
यांच्यासह..

*आजरा तालुका कार्यकारणी*
*तालुका नेते-* तुकाराम बामणे
                   तानाजी पावले
*जिल्हा कोषाध्यक्ष-* अशोक शिवणे
*जिल्हा उपाध्यक्ष-* बाबू गवंडी
*जिल्हा संघटक-* दिनकर देसाई
=======
*तालुका अध्यक्ष* प्रकाश तिबिले
*सरचिटणीस-* उमाजी कुंभार
*कार्याध्यक्ष-* रवि येसादे
*कोषाध्यक्ष-* अनिल कांबळे
*प्रमुख संघटक-* प्रकाश जाधव
*प्रमुख सल्लागार-* संतराम केसरकर
*प्रसिध्दी प्रमुख-* राजाराम नेवरेकर, 
          मारूती पाटील
*कार्यकारी सचिव-* वंदन जाधव
              आनंद मूनुनकर
*महिला अध्यक्षा-* सुनिता सावरतकर
*महिला सरचिटणीस-* आसावरी मुनुनकर
*महिला उपाध्यक्षा-* संतोषी कुंभार
           पुष्पा येसादे
           सुरेखा नाईक
           अंजना जाधव
           
*महिला संघटक-* शालन माळी
           मंगल पाटील
          सारिका गुरव्
          मनिषा कातकर
  *उपाध्यक्ष-* गणपती भादवणकर
                मारूती साळवेकर
             दिनकर कुंभार
           अर्जुन कोकितकर
           विनायक गुंजकर
            
*संघटक-* संतोष बिल्ले
              तानाजी नेवरेकर
            आबासो कुंभार
            दत्तात्रय चौगुले
           श्रीधर देसाई
           अनिल शेंडे
           रमेश पाटील
           वसंत सावंत
          रामचंद्र रेंबळे
           पांडुरंग संकपाळ
           दशरथ अस्वले
           सुभाष नाईक
           आप्पा पाटील
          संजय केसरकर
         मारूती डेळेकर
          बाळासो वांजोळे
*सल्लागार-* निवृत्ती मुरूक्टे
                धनाजी पोटे
                 राजेंद्र माने
                हणमंत सुतार
               उदय कारेकर
                संभाजी माळी
               आप्पासो पुंडपळ
                संतोष लाड
                उत्तम कोकितकर
               अनिल बोलके
               ईश्वर मटकर
               राजू कांबळे
               सुरेश शिंगटे
              जानबा कुंभार
=========
     आदी पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
      *अधिवेशनात जिल्हा सरचिटणीस मा.शंकर पवार सर यांनी नुतन कार्यकारणी जाहीर केली. नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.*
    स्वागत व प्रास्ताविक तालुका प्रमुख संघटक प्रकाश जाधव यांनी केले, आभार प्रसिध्दी प्रमुख राजाराम नेवरेकर यांनी मानले. सुत्र संचलन मारूती पाटील यांनी केले.
कामाची हमी..
जय पुरोगामी..












































1 comment:

कोरोना काळातही कागल तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची कार्य कौतुकास्पद- शिक्षण सभापती अंबरिषसिंग घाटगे

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनगेकर यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या पहिल्या शिष्यवृत्ती सराव चाच...