Friday, December 4, 2020

गटतट न मानता शिक्षकांचे प्रश्न सोडविल्यानेच पुरोगामी शिक्षक संघटनेची अल्पावधीत गरूडझेप - प्रसाद पाटील

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना

तालुका शाखा- कागल 

🚩 सहविचार सभा 🚩



       गेली 24 वर्षे शिक्षकांचे प्रश्न सोडविताना गटतट, जाती धर्म न मानता शिक्षक ही एकच जात व प्रामाणिकपणे सेवा हा एकच धर्म माणून महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनाने कोल्हापूर जिल्ह्यात व राज्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविल्याने संघटनेने अल्पावधीतच गरूडझेप घेतली असल्याचे प्रतिपादन संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले.

    नुकत्याच झालेल्या कागल शाखेच्या सहविचार सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

     सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटक एन एस पाटील होते.

      यावेळी बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल पोवार म्हणाले राज्याला मार्गदर्शन करणारे नेतृत्व म्हणजे मा प्रसाद पाटील सर असून सरांच्या अथक परिश्रमाने अचूक रोष्टर पूर्ण झाल्याने गेल्या तीन वर्षात  500 ते 600 शिक्षक आपल्या जिल्ह्यात येऊ शकले आणि त्यांचे कुटुंब स्थीर झाले. त्या सर्व कुटुंबांचे आशिर्वाद प्रसाद पाटील यांच्या पाठीशी आहेत. प्रसाद पाटील यांच्या निःपक्षपाती काम करण्याचा पध्दतीवर शंका घेणाऱ्यांना बदली , बढतीमध्ये रोष्टर खूप  महत्वाचे असल्याची जाणीव झाली आणि प्रसाद पाटील सरांनी रोष्टर पूर्ती केलेल्या कार्याचीही .. 

      जिल्हा सरचिटणीस शंकर पवार म्हणाले शिक्षक बँकेतील चेअरमन/ व्हा चेअरमन पदाच्या आमिशाला बळी न पडता प्रसाद पाटील यांनी ठामपणे विरोधी भूमिका बजावल्याने आज सभासदांना समाधानकारक व्याज व डिव्हिडंड मिळत आहे. व कर्जावरील व्याजदर 11% इतका खाली आला. सत्ताधारी संचालक मंडळाने आणलेला नोकर भरतीचा विषयाचे आम्ही कधीच समर्थन कलेले नाही. काही लोक म्हणतात म्हणून सदर भरती बेकायदेशीर ठरली तरी आमचा त्यास विरोध असणार नाही.

       कोषाध्यक्ष अशोक खाडे म्हणाले प्रशासनात व सहकारात एखाद्या प्रश्नाची अभ्यासपूर्ण मांडणी करून त्याची उकल करण्याचे सामर्थ्य श्री प्रसाद पाटील सर यांच्याकडेच आहे. अनेक लोक सरांना मार्गदर्शनसाठी फोन करतात. सर समरोच्याचे नाव न विचारता योग्य मार्गदर्शन करतात हे वेगळेपण आहे.

     महिला सरचिटणीस शारदा वाडकर म्हणाल्या महिलांचा सन्मान करणारी संघटना म्हणून पुरोगामीची ओळख असून महिला कमिटीच्या वतीने सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.

     यावेळी जिल्हाध्यक्ष एस के पाटील, जिल्हा प्रमुख संघटक दिगंबर टिपुगडे, जिल्हा प्रमुख सल्लागार आर एस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

      सभेस राज्य उपाध्यक्ष दिलीप भोई , राज्य कार्य सचिव रंगराव वाडकर, राज्य संघटक पी आर पाटील, प्रभाकर चौगले , प्रेरणा चौगले , सर्जेराव ढेरे, सुरेश हुली, द्रोणाचार्य पाटील ,अतुल सुतार ,महेश कोरवी ,दिलीप कांबळे ,अर्जुन पाटील, विठ्ठल देवणे, दिपक माने..

आदी पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

   दरम्यान कागल  शाखेचा पदाधिकारी विस्तार करून नुतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विशेष यश प्राप्त केलेल्या पाल्यांचा व शिक्षकांचा या सभेत गौरव- सत्कार करण्यात आला.

     स्वागत व प्रास्ताविक कागल तालुका अध्यक्ष आनंदा मालवेकर यांनी केले तर आभार संदीप माने यांनी मानले. तर सुत्रसंचलन तालुका सरचिटणीस बाळनाथ डवरी यांनी केले.

🙏

No comments:

Post a Comment

कोरोना काळातही कागल तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची कार्य कौतुकास्पद- शिक्षण सभापती अंबरिषसिंग घाटगे

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनगेकर यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या पहिल्या शिष्यवृत्ती सराव चाच...