Wednesday, February 10, 2021

कोरोना काळातही कागल तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची कार्य कौतुकास्पद- शिक्षण सभापती अंबरिषसिंग घाटगे

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनगेकर यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या पहिल्या शिष्यवृत्ती सराव चाचणी च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते . शिष्यवृत्ती सराव चाचणी उद्घाटन सोहळा विद्या मंदिर बाचणी ता कागल शाळेत संपन्न झाला .. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती पूनम मगदूम होत्या . कागल तालुका शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवण्यासाठी शिक्षक जादा वेळ देऊन मार्गदर्शन करत असतात . कागल तालुक्यातील मार्गदर्शक शिक्षकांचे कार्य खूप मोलाचे आहे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी डॉक्टर जी बी कमळकर यांनी केले .. कार्यक्रमाला उपसभापती अंजना सुतार, राजाराम वरुटे , जी एस पाटील , सुकुमार पाटील , भिकाजी सोनाळकर , अल्लाबक्ष शहाणेदिवाण, उत्तम पाटील , आवेलीन देसा , सदानंद पाटील , प्रकाश मगदूम , कास्ट्राईब महासंघाचे पदाधिकारी , शिक्षक उपस्थित होते . प्रास्ताविक एस के पाटील, स्वागत अंकूश माने यांनी तर आभार संजय चिखलीकर यांनी मानले .

Saturday, January 30, 2021

ग्लोबल टीचर रणजित डिसले सर यांचे उपस्थितीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांचे हस्ते यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे सत्कार संपन्न..

सन 2019-20 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती,प्रज्ञाशोध,, जे पी नाईक समृध्द शाळा अभियान पुरस्कार प्राप्त शाळा ...यशस्वी विद्यार्थी,,,, मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचा सत्कार पं समिती कागल यांचे मार्फत आज ग्लोबल टिचर रणजीत डिसले सर यांचे उपस्थितीत, ग्रामविकास मंत्री हसनसो मुश्रीफ साहेब यांचे हस्ते संपन्न झाला.

      तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ जी बी कमळकर साहेब यांचे नेतृत्वाखाली संयोजन समिती सदस्यांनी कार्यक्रमाचे देखणे ,नेटके व सुक्ष्म  नियोजन केले होते .. विशेषतः मटकरी हॉलचे मालक यांनी सर्व सोयींनी सुसज्ज असा मोफत हॉल उपलब्ध करून दिला .. सोबत मोफत नाष्टाही .. त्यांचे आभार मानावे तितके थोडकेच .. 

      ग्लोबल टिचर रणजीत सरांनी दोन तास खुर्चीला खिळवून ठेवणारे केलेले लोकल ते ग्लोबल प्रवासाचे प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमांची उंची वाढविणारे होते ..

      ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेबांचे कार्य सर्वांना सर्वश्रृत आहेच .. आज तब्बल तीन चार वेळ देऊन व्यक्तिशः सर्वांचा सत्कार करून प्रोत्साहित केले .. त्यामूळे पुरस्कार प्राप्त शिक्षक , विद्यार्थी कृतार्थ झाले . . साहेबांना अंतकरण पूर्वक धन्यवाद .

           कोल्हापूरचे ग्लोबल पदाधिकारी, १०० % डिजीटल वर्गाचे निर्माते   मा शिक्षण सभापती अमरीषदादांचेही मार्गदर्शन खूप अनमोल वाटले ..

         कार्यक्रमासाठी शेवटपर्यंत उपस्थित राहिलेले शिक्षण सभापती प्रवीण यादव साहेब ,मुख्य कार्यकारी अधिकारी  चव्हाण साहेब , शिक्षणाधिकारी उबाळे मॅडम, गटविकास अधिकारी संसारे  साहेब , कार्यक्रमाच्या अध्यक्षा पूनम मगदूम मॅडम , जि प सदस्य , पं स सदस्य यांच्याही उपस्थितीमूळे कार्यक्रमाची उंची वाढली .

       गेले महिनाभर याचे नियोजन सुरु होते .. विद्यार्थी , मार्गदर्शक यांच्या याद्या करणे , फोटो संकलीत करणे.. सन्मानपत्र , स्मृतीचिन्ह तयार करणे .. या सर्व नियोजनासाठी अगदी रात्र रात्रभर काम सुरू होते .. बाबासाहेब कमळकर सर , संजय मांडवे सर , रमेश कदम सर , गावडे साहेब यांनी तर खूप कष्ट घेतले ..

 विस्तार अधिकारी कासोटे मॅडम , आर व्ही कांबळे साहेब , संकेश्वरे साहेब , केंद्रप्रमुख किणेकर मॅडम यांचे वेळावेळी मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम प्रसंगी त्यांची नियोजन धावपळ ... शेवटच्या महत्वाच्या क्षणी गुंडाळे सर , आर एस पाटील सर , सुनिल चौगले सर , विजय मिस्त्री सर , बाबूराव चव्हाण सर , सुनिल पाटील सर , संजय कुदळे सर , विठ्ठल पाटील सर, सर्व BRC समन्वयक या मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले . .. आपल्या अमोघ वाणीने मंत्रमुग्ध करणारे सुत्रसंचालक विवेक गवळी सर , वनिता साबणे मॅडम , गीतांजली पाटील मॅडम यांच्या सुत्रसंचालनाने कार्यक्रम सुसुत्रपणे पार पडण्यास मदत झाली ..

        सर्वांच्या सहकार्याने खूप सुंदर कार्यक्रम झाला .. कार्यक्रम करताना किती धावपळ होते हे कार्यक्रम नियोजन कर्त्यांनाच माहित असते .. आणि कार्यक्रम यशस्वी झाले नंतर त्यानंतर मिळणारा आनंद म्हणजे स्वर्गसुख असते .. हे आम्हां सातत्याने अनुभवतो म्हणून आजच्या कार्यक्रमाचे सिंहावलोकन .. . कार्यकमात कांही त्रुटी राहिल्या असतीलही पण चांगले , मोठे कार्यक्रम केले तर कांही त्रुटी राहतात ,केलेच नाही कार्यक्रम तर असे प्रश्नच उद्भवत नाहीत .. त्यामूळे त्याकडे दुर्लक्ष करून प्रोत्साहीत करणे महत्वाचे वाटते  . . 

      कार्यक्रमाचे सर्वात मोठे श्रेय कोणाचे असेल तर ते एक हजारांपासून एकवीस हजारांपर्यत मदत करणाऱ्या दातृत्वान शिक्षक, अधिकारी आणि सामाजिक बंधू भगिनींचे.. ज्यांच्या दातृत्वातून बारा लाखाचा गंगाजळीचा टप्पा पार झाला आणि आजच्या कार्यक्रमाला भव्य दिव्य स्वरूप आले

       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांना मनापासून धन्यवाद

🙏🙏🙏🙏🙏

  

एस के पाटील , जिल्हाध्यक्ष पुरोगामी तथा शिष्यवृत्ती एक्सपर्ट टीम सदस्य

Saturday, January 16, 2021

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांना निवेदन



  महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करताना संघटनेचे राज्याध्यक्ष मा.प्रसाद पाटील, शिक्षक नेते मा.मोहन भोसले मामा
     यावेळी जिल्हाध्यक्ष एस के पाटील, राज्य संघटक पी आर पाटील, शहर अध्यक्ष विलास पिंगळे, शहर सरचिटणीस द्रोणाचार्य पाटील, जिल्हा प्रमुख संघटक दिगंबर टिपुगडे, संजय गांगण, काशिराम बिरूनगी, दिलीप लोखंडे, संतोष आंबेकर, शिवाजी गुरव, प्रकाश गावडे, अरुण सुनगार शंकर साळुंखे , नितीन गभाले, विद्या कदम, शारदा वाडकर, सुजाता निगवेकर, स्मिता कारेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कामाची हमी..जय पुरोगामी


Sunday, December 6, 2020

कै. रवि शेंडे यांची स्वप्नपूर्ती हीच त्यांना खरी श्रध्दांजली.. प्रसाद पाटील

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना..
       🚩 तालुका शाखा आजरा 🚩
          ✡️ अधिवेशन ✡️



       शिक्षक नेते कै. रवि शेंडे यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली असल्याने शेंडे सरांच्या स्वप्न पूर्ततेसाठी आपण सर्वांनी कंबर कसली पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले.
     नुकत्याच आजरा येथे झालेल्या आजरा तालुका शाखा अधिवेशन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.के एस पाटील होते.
       
प्रसाद पाटील पुढे म्हणाले 2015 च्या शिक्षक बँक निवडणुकीत प्रसाद पाटील व रवि श़ेडे जोडी फोडण्यात विरोधक यशस्वी झाले होते. आमच्या जोडीचा धसका घेऊन ही जोडी फोडण्यासाठी सर्व विरोधक एकवटले होते. युती करताना आजरा तालुका आमच्या वाट्याला न सोडल्याने रवि शेंडे यांना उमेदवारी आम्हाला देता आली नाही. याचा फायदा विरोधांनी उठवून आमच्यामध्ये दरी निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले होते.
       आमच्यात तात्विक मतभेद असले तरी मनभेद कधीच नव्हते त्यामुळे आज सर्व मतभेद विसरून पुन्हा एकत्र येऊन काम करण्याचा आजरा शाखेने घेतलेला निर्णयाचे आम्ही स्वागत करीत असून रवि शेंडे सरांच्या स्वप्न पूर्ततेसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार आहोत.
       यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष एस के पाटील म्हणाले कोणताही गट - तट न मानता, शिक्षक ही एकच जात व सेवा हा एकच धर्म समजून संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील व राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविण्यात आले आहेत.
       जिल्हा सरचिटणीस शंकर पवार म्हणाले, संघटनात्मक कामाच्या जोरावरच महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने अल्पावधीतच जिल्ह्यात व राज्यात गरूड झेप घेतली असून पाच वर्षाचा आपला दुरावा संपला असून आजचा हा कार्यक्रम विरोधकांना भूवया उंचवायला लावणारा आहे.
       राज्य उपाध्यक्ष दिलीप भोई म्हणाले प्रसाद पाटील सर यांच्या खांद्याला खांदा लावून रवि शेंडे यांनी सन 2005 बँक बचाव कृती समितीचा यशस्वी लढा उभा केला होता. त्या लढ्यामुळेच बँक आज सुस्थितीत आली आहे.
     जिल्हा प्रसिध्दी प्रमुख दिगंबर टिपुगडे म्हणाले प्रसाद पाटील यांचे नेतृत्वाखाली बँक बचाव कृती समितीने 2005 पासून दिलेला संघर्षमय लढा सर्वांना ज्ञात असून प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी संचालकांनी ठामपणे विरोधी भुमिका वठवल्याने कोल्हापूर शिक्षक बँकेची आजची आर्थिक स्थिती मजबूत झाली असून सभासदांना समाधानकारक व्याज व लाभांश मिळत आहे आणि कर्जावरील व्याजदरही 11% पर्यंत खाली आणता आला. कोणत्याही आमिषाला बळी न पडता सभासदांनी दाखवलेल्या विश्वासास पात्र राहूनच प्रसाद पाटील यांनी काम केल्याने बँकेचा खरा नफा दिसत आहे.
      शिक्षक नेते तानाजी पावले यांनी पुरोगामी शिक्षक संघटनेचा जन्मच संघर्षासाठी झाला असून कै रवि शेंडे यांच्या स्वप्न पूर्ततेसाठी आज-यातील सर्व ताकद पुरोगामी शिक्षक संघटनेच्या पाठिशी उभा केली जाईल असे सांगितले.
     कार्याध्यक्ष सुनिल पोवार सर यांनी रोस्टर पुर्ततेसाठी प्रसाद पाटील यांचे योगदान, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख अशोक खाडे सर यांनी संघटनेचे सामाजिक कार्य व उपक्रम, राज्य संचटक पी आर पाटील यांनी अल्पावधीत पुरोगामी परिवाराने कोविड सेंटरनां केलेली मदत, महिला जिल्हा सरचिटणीस शारदा वाडकर यांनी संघटनेत महिलांना असलेला सन्मान याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
     सभेस राज्य कार्यकारी सचिव रंगराव वाडकर, जिल्हा संघटक नामदेव पाटील, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष सुरेश हुली , विकास पाटील , सुरेश गुरव , सुरेश पूजारी , सुरेश गुडूळकर , भुदरगड सरचिटणीस जयदीप डाकरे , दिग्विजय कोटकर , दिलीप कांबळे, संदीप गिरी
यांच्यासह..

*आजरा तालुका कार्यकारणी*
*तालुका नेते-* तुकाराम बामणे
                   तानाजी पावले
*जिल्हा कोषाध्यक्ष-* अशोक शिवणे
*जिल्हा उपाध्यक्ष-* बाबू गवंडी
*जिल्हा संघटक-* दिनकर देसाई
=======
*तालुका अध्यक्ष* प्रकाश तिबिले
*सरचिटणीस-* उमाजी कुंभार
*कार्याध्यक्ष-* रवि येसादे
*कोषाध्यक्ष-* अनिल कांबळे
*प्रमुख संघटक-* प्रकाश जाधव
*प्रमुख सल्लागार-* संतराम केसरकर
*प्रसिध्दी प्रमुख-* राजाराम नेवरेकर, 
          मारूती पाटील
*कार्यकारी सचिव-* वंदन जाधव
              आनंद मूनुनकर
*महिला अध्यक्षा-* सुनिता सावरतकर
*महिला सरचिटणीस-* आसावरी मुनुनकर
*महिला उपाध्यक्षा-* संतोषी कुंभार
           पुष्पा येसादे
           सुरेखा नाईक
           अंजना जाधव
           
*महिला संघटक-* शालन माळी
           मंगल पाटील
          सारिका गुरव्
          मनिषा कातकर
  *उपाध्यक्ष-* गणपती भादवणकर
                मारूती साळवेकर
             दिनकर कुंभार
           अर्जुन कोकितकर
           विनायक गुंजकर
            
*संघटक-* संतोष बिल्ले
              तानाजी नेवरेकर
            आबासो कुंभार
            दत्तात्रय चौगुले
           श्रीधर देसाई
           अनिल शेंडे
           रमेश पाटील
           वसंत सावंत
          रामचंद्र रेंबळे
           पांडुरंग संकपाळ
           दशरथ अस्वले
           सुभाष नाईक
           आप्पा पाटील
          संजय केसरकर
         मारूती डेळेकर
          बाळासो वांजोळे
*सल्लागार-* निवृत्ती मुरूक्टे
                धनाजी पोटे
                 राजेंद्र माने
                हणमंत सुतार
               उदय कारेकर
                संभाजी माळी
               आप्पासो पुंडपळ
                संतोष लाड
                उत्तम कोकितकर
               अनिल बोलके
               ईश्वर मटकर
               राजू कांबळे
               सुरेश शिंगटे
              जानबा कुंभार
=========
     आदी पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
      *अधिवेशनात जिल्हा सरचिटणीस मा.शंकर पवार सर यांनी नुतन कार्यकारणी जाहीर केली. नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.*
    स्वागत व प्रास्ताविक तालुका प्रमुख संघटक प्रकाश जाधव यांनी केले, आभार प्रसिध्दी प्रमुख राजाराम नेवरेकर यांनी मानले. सुत्र संचलन मारूती पाटील यांनी केले.
कामाची हमी..
जय पुरोगामी..












































Friday, December 4, 2020

गटतट न मानता शिक्षकांचे प्रश्न सोडविल्यानेच पुरोगामी शिक्षक संघटनेची अल्पावधीत गरूडझेप - प्रसाद पाटील

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना

तालुका शाखा- कागल 

🚩 सहविचार सभा 🚩



       गेली 24 वर्षे शिक्षकांचे प्रश्न सोडविताना गटतट, जाती धर्म न मानता शिक्षक ही एकच जात व प्रामाणिकपणे सेवा हा एकच धर्म माणून महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनाने कोल्हापूर जिल्ह्यात व राज्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविल्याने संघटनेने अल्पावधीतच गरूडझेप घेतली असल्याचे प्रतिपादन संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले.

    नुकत्याच झालेल्या कागल शाखेच्या सहविचार सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

     सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटक एन एस पाटील होते.

      यावेळी बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल पोवार म्हणाले राज्याला मार्गदर्शन करणारे नेतृत्व म्हणजे मा प्रसाद पाटील सर असून सरांच्या अथक परिश्रमाने अचूक रोष्टर पूर्ण झाल्याने गेल्या तीन वर्षात  500 ते 600 शिक्षक आपल्या जिल्ह्यात येऊ शकले आणि त्यांचे कुटुंब स्थीर झाले. त्या सर्व कुटुंबांचे आशिर्वाद प्रसाद पाटील यांच्या पाठीशी आहेत. प्रसाद पाटील यांच्या निःपक्षपाती काम करण्याचा पध्दतीवर शंका घेणाऱ्यांना बदली , बढतीमध्ये रोष्टर खूप  महत्वाचे असल्याची जाणीव झाली आणि प्रसाद पाटील सरांनी रोष्टर पूर्ती केलेल्या कार्याचीही .. 

      जिल्हा सरचिटणीस शंकर पवार म्हणाले शिक्षक बँकेतील चेअरमन/ व्हा चेअरमन पदाच्या आमिशाला बळी न पडता प्रसाद पाटील यांनी ठामपणे विरोधी भूमिका बजावल्याने आज सभासदांना समाधानकारक व्याज व डिव्हिडंड मिळत आहे. व कर्जावरील व्याजदर 11% इतका खाली आला. सत्ताधारी संचालक मंडळाने आणलेला नोकर भरतीचा विषयाचे आम्ही कधीच समर्थन कलेले नाही. काही लोक म्हणतात म्हणून सदर भरती बेकायदेशीर ठरली तरी आमचा त्यास विरोध असणार नाही.

       कोषाध्यक्ष अशोक खाडे म्हणाले प्रशासनात व सहकारात एखाद्या प्रश्नाची अभ्यासपूर्ण मांडणी करून त्याची उकल करण्याचे सामर्थ्य श्री प्रसाद पाटील सर यांच्याकडेच आहे. अनेक लोक सरांना मार्गदर्शनसाठी फोन करतात. सर समरोच्याचे नाव न विचारता योग्य मार्गदर्शन करतात हे वेगळेपण आहे.

     महिला सरचिटणीस शारदा वाडकर म्हणाल्या महिलांचा सन्मान करणारी संघटना म्हणून पुरोगामीची ओळख असून महिला कमिटीच्या वतीने सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.

     यावेळी जिल्हाध्यक्ष एस के पाटील, जिल्हा प्रमुख संघटक दिगंबर टिपुगडे, जिल्हा प्रमुख सल्लागार आर एस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

      सभेस राज्य उपाध्यक्ष दिलीप भोई , राज्य कार्य सचिव रंगराव वाडकर, राज्य संघटक पी आर पाटील, प्रभाकर चौगले , प्रेरणा चौगले , सर्जेराव ढेरे, सुरेश हुली, द्रोणाचार्य पाटील ,अतुल सुतार ,महेश कोरवी ,दिलीप कांबळे ,अर्जुन पाटील, विठ्ठल देवणे, दिपक माने..

आदी पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

   दरम्यान कागल  शाखेचा पदाधिकारी विस्तार करून नुतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विशेष यश प्राप्त केलेल्या पाल्यांचा व शिक्षकांचा या सभेत गौरव- सत्कार करण्यात आला.

     स्वागत व प्रास्ताविक कागल तालुका अध्यक्ष आनंदा मालवेकर यांनी केले तर आभार संदीप माने यांनी मानले. तर सुत्रसंचलन तालुका सरचिटणीस बाळनाथ डवरी यांनी केले.

🙏

Tuesday, December 1, 2020

संगणक अर्हता साठी मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार- प्रसाद पाटील

  


राज्यातील शिक्षकांना संगणक अर्हता उत्तीर्ण होणेबाबत प्रशासनाने लेखी न कळविल्याने त्यांची वेतनवाढ रोखने ही बाब बेकायदेशीर असल्याने संगणक अर्हता प्राप्त करण्यासाठी मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू अहल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघकनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले.

    नुकत्याच झालेल्या राधानगरी शाखेच्या सहविचार सभेच्या अध्यपदावरून ते बोलत होते.


यावेळी कोल्हापूर जिल्हा नेते-  जी के पाटील बापू, राज्य उपाध्यक्ष - दिलीप भोई, राज्य संघटक : पी आर पाटील, जिल्हाध्यक्ष : एस के पाटील, जिल्हा सरचिटणीस : शंकरराव पवार, कार्याध्यक्ष : सुनिल पोवार, कोषाध्यक्ष : अशोकराव खाडे, प्रमुख संघटक- दिगंबर टिपुगडे, महिला जिल्हा सरचिटणीस शारदा वाडकर, जिल्हा कार्य सचिव : आनंदराव जाधव, राज्य उपाध्यक्षा : प्रमिला माने यांनी मनोगत व्यक्त केले.. तसेच सचिन गुरव, विजय पाटील, अरुण टिपुगडे, श्रीकांत टिपुगडे, तानाजी निकम, शशिकला नलवडे, सुनिता पाटील, सुशांत कांबळे, सुरेखा भोरे..

यांच्यासह

*राधानगरी तालुका कार्यकारणी*

🏵️अध्यक्ष : सर्जेराव ढेरे

✡️सरचिटणीस : संदिप नलवडे

🏵️कार्याध्यक्ष : सदाशिव साठे

✡️कोषाध्यक्ष : बळवंत गुरव

✡️ प्रमुख संचटक: भिमराव शिट्याळकर

✡️ महिला तालुका अध्यक्षा : सौ जयश्री टिपुगडे

🏵️ महिला सरचिटणीस : सौ रूपाली ठोंबरे

✡️ महिला कार्याध्यक्षा : सौ अनघा कानकेकर

🏵️ महिला कोषाध्यक्षा :सौ साधना पाटील

✡️ महिला प्रमुख संघटक: अश्विनी पाटील

✡️ प्रसिद्धी प्रमुख- राजेंद्र मिटके..


✡️ *उपाध्यक्ष-*

विनोदकुमार पाटील

कृष्णात कांबळे

मोहन पाटील

आनंदा बनकर

तळजू लांबोरे


✡️ *महिला उपाध्यक्षा-*

सरिता पाटील

रंजना हालके


🏵️ *संघटक-*

प्रकाश शिंगण

विठ्ठल केंगार

सागर पाटील

एकनाथ पिलावरे

अशोक जाधव


✡️ *महिला संघटक-*

ज्योती गुरव

मिनाक्षी सुरवदे

सुरेखा ढेरे

आंबुताई कांबळे


🏵️ सल्लागार

रघुनाथ पाटील

मंगल बामणे


*राधानगरी शाखा पदसिद्ध पदाधिकारी तथा..*

🏵️ *राज्य-जिल्हा पदाधिकारी*

✡️ राज्य कार्य.सचिव- रंगराव वाडकर

✡️ जिल्हा प्रमुख संघटक- दिगंबर टिपुगडे

✡️ महिला जिल्हा सरचिटणीस- शारदा वाडकर

✡️ जिल्हा उपाध्यक्ष- रघुनाथ लाड

✡️ महिला जिल्हा उपाध्यक्षा- संगिता कवडे

🏵️जिल्हा सल्लागार - विठ्ठल मोरे, 

विजयराव मगदूम


आदी उपस्थित होते.

   दरम्यान राधानगरी शाखेचा पदाधिकारी विस्तार करून नुतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विषय यश प्राप्त केलेल्या पाल्यांचा व शिक्षकांचा या सभेत गौरव करण्यात आला.

     स्वागत राधानगरी तालुका सरचिटणीस संदीप नलवडे यांनी केले, प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सर्जेराव ढेरे यांनी केले तर आभार राज्य कार्यकारी सचिव रंगराव वाडकर यांनी मानले. तर सुत्रसंचलन जिल्हा प्रमुख संघटक दिगंबर टिपुगडे यांनी केले.


कोरोना काळातही कागल तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची कार्य कौतुकास्पद- शिक्षण सभापती अंबरिषसिंग घाटगे

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनगेकर यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या पहिल्या शिष्यवृत्ती सराव चाच...